धुळे । येथील नगाव बारी जवळ दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी धुळ्याकडे जाणारे दैनिक जनशक्तिचे होळनांथे येथील प्रतिनिधींनी जखमींना खाजगी रूग्नालयात दाखल केले. नगाव गावाकडून येणार्या हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम.एच 18 क्यु 5433 व धुळ्याकडून येणारी स्कुटी एम.एच 18 ए व्ही 0247 यांच्यात सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या समोरा समोर धडकेत एका तरूणीसह दोन जण जखमी झाले. यावेळी स्कुटी वरील तरूणी निशीगंधा सुरेश पाटील तसेच दुचाकीवरील आणखी दोघी जखमी कित्येक वेळ अपघात स्थळी पडले होते. दरम्यान अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी कोणीही पुढे सरसावत नव्हते. यावेळी दैनिक जनशक्तिचे होळनांथे प्रतिनिधी योगेश पाटील हे शिरपूरहून धुळ्याकडे जात असतांना रस्त्यात जखमींना पडलेले पाहून आपली गाडी थांबवली. तिन्ही जखमींना खाजगी वाहनाने सुधा हॉस्पिटल या खाजगी रूग्णालयात दाखल केले.यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
दुचाकीवरचा नंबर संशयास्पद
हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीवरचा खोडून हाताने लिहलेला क्रमांक संशयास्पद असल्याचे समजते त्यामुळे सदर गाडी चोरीची असल्याची शंका त्याठिकाणी जमलेले लोकांमध्ये चर्चा होती. गाडीचा क्रमांक एम.एच 18 क्यु 5433 असून खोडून 5488 केलेला आहे.