दुचाकीच्या अपघातात शेतकरी ठार

0

यावल । फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकी धारकात अपघात होवुन एक जण जागीच ठार झाला. चंद्रकांत जगन्नाथ पाटील (वय 63 वर्ष, रा. डोंगरकठोरा ता. यावल) असे मयताचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडला. शहरातुन फैजपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर माहविद्यालयाच्या पुढे यावलकडून फैजपूरकडे फरीद खान युनूस खान (रा. यावल) हा दुचाकी क्र (एम.एच. 19 बी.डब्ल्यु. 4436) वरून जात होता त्यास मोबाईलवर कॉल आल्याने त्याने अचानक वाहन हळू केले तेव्हा मागुन दुचाकी क्र. (एम. एच. 19 बी.ए. 7672) वरील चालक चंद्रकांत जगन्नाथ पाटील (वय-63 वर्ष, रा. डोंगरकठोरा) यांनी वाहनावरील ताबा सुटत मागुन धडक दिली. त्यात ते स्वत:हा रस्त्यावर आदळले जावुन डोक्याला गंभीर दुखापत होत चंद्रकांत हे जागीचे ठार झाले. याघटनेबाबत दोन जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून समजते.