जळगाव – शहरातील अजिंठा चौफुली जवळ झालेल्या दुचाकीच्या अपघातात उमाळा येथील युवक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तालुक्यातील उमाळा येथील आकाश अमोल गुळवे (वय-२०) या युवक दुचाकी अपघतात जखमी झाला. दरम्यान नागरिकांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र आकाश याला जास्त मार लागल्यामुळे नातेवाईकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.