धुळे : शहरातील जे.बी.रोडवरील इलेक्ट्रीक दुकानासमोरून सोमवार, 16 ऑगस्ट रोजी अॅक्टीव्हा दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी एक लाख 20 हजारांची 150 रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गरूड कॉम्प्लेक्स भागातून विशाल विक्रम तमायचे (40, बंगला एरीया, सत्यनारायण दूध घर, अहमदाबाद) व बंटी राजेश इंद्रेकर (24, नरोडा पाटीया, कुबेर नगर, सवेरा हॉटेलसमोर, अहमदाबाद) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एक लाख दोन हजारांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व दोन स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आले. संशयीतांच्या अटकेनंतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात सहा.निरीक्षक दादासाहेब पाटील, नाना आखाडे, भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी रवींद्र गिरासे, पंकज खैरमोडे, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, निलेश पोतदार, प्रवीण पाटील, मनीष सोनगिरे, शाकीर शेख, गुणवंत पाटील, वसंत कोकणी, प्रसाद वाघ, विवेक साळुंखे, अविनाश कराड, चालक नितीन अहिरे, किरण भदाणे आदींच्या पथकाने केली.