पिंपरी : गावाकडील शेतजमीन विकून आलेली पावणेसहा लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली असता रोकड ठेवलेली बॅग आणि बँकेचे चेकबुक व पासबुक अज्ञात चोरट्यांनी लांबवले. ही घटना चिंचवड येथे एम्पायर इस्टेटमध्ये घडली. याप्रकरणी सुरज तरडगावकर (वय 47, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी : गावाकडील शेतजमीन विकून आलेली पावणेसहा लाख रुपयांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली असता रोकड ठेवलेली बॅग आणि बँकेचे चेकबुक व पासबुक अज्ञात चोरट्यांनी लांबवले. ही घटना चिंचवड येथे एम्पायर इस्टेटमध्ये घडली. याप्रकरणी सुरज तरडगावकर (वय 47, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावाकडची शेतजमीन विकलीसुरज तरडगावकर यांचे पंढरपूरजवळ गाव आहे. त्यांनी नुकतीच गावाकडील शेत जमीन विकली होती. त्याचे पैसे त्यांना मिळाले होते. 2 ऑगस्ट रोजी त्यांनी काही रोकड बँकेत ठेवली. तर उर्वरित पावणेसहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि बँकेचे चेकबुक व पासबुक त्यांनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर त्यांनी रांका ज्वेलर्समागे असलेल्या पार्कींगमध्ये दुचाकी पार्क केली होती. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून रोख रक्कम व चेकबुक-पासबुक लंपास केले.
रेकी केल्याची शक्यताकाही वेळाने सुरज तरडगावकर हे दुचाकीजवळ आले असता, त्यांना दुचाकीची डिक्की उघडी असल्याचे दिसले. चोरट्याने डिक्कीतील 5 लाख 71 हजार रुपयांची रोकड आणि बँकेचे चेकबुक आणि पासबुक चोरून नेले. या घटनेमुळे तरडगावकर यांची मन:स्थिती ठिक नव्हती. त्यांनी बँकेत जाऊन चेकबुक आणि पासबुक बंद केले. त्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने सुरज यांच्या हालचालींवर नजर ठेऊन ही चोरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. फौजदार रोहिणी ढेरे तपास करत आहेत.