भुसावळ : शहरातील रहिवासी असलेल्या रेशन दुकानदाराचे दुचाकीच्या डिक्कीतून 12 हजार 700 रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ई पॉस मशीनसह रोकड लांबवली
रेशन दुकनदार अक्षय भरत मोरे (27, शिवपूर कन्हाळा रोड, घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडील दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी दोन ई पॉस मशीन, 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, दोन हजार 700 रुपयांची रोकड असे एकूण 12 हजार 700 रुपयांचे साहित्य 15 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लांबवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक महेश एकनाथ चौधरी करीत आहेत.