दुचाकीच्या धडकेत मंडळाधिकारीचा मृत्यू

0

यावल । तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ फैजपूर कडून यावलकडे येत असतांना दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. मिळलेल्या माहितीनुसार कृष्णतारानगर येथील खिरोदा ता. रावेर येथे मंडळाधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजु दिलदार तडवी (वय -45) हे दुचाकीवरून फैजपूरकडून यावलकडे येत असतांना अज्ञात दुचाकीस्वारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याधडकेची माहिती मिळाल्यानंतर रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषीत केले.