दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – काळेवाडी फाटा येथे दुचाकीच्या धडकेत 30 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. मंगल मल्लीनाथ तुपे (वय 30 रा. संभाजीनगर, थेरगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. वाकड पोलिसांनी अल्पवयीन दुचाकी चालकाला ताब्यात घेतले आहे.

काळेवाडी फाट्याजवळ दुर्घटना
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मंगल या काळेवाडीफाट्याच्या दिशेने पायी जात असताना दुचाकी स्वाराने त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करत आहेत.