जळगाव। दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने निर्मल मनीष साभद्र हा विद्यार्थी जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रविवारी दुपारी बारा वाजता आयटीआयच्या मागील गल्लीत झाला.
मनीष हा बाहेती महाविद्यालयात 11 वी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. रविवारी तो महाविद्यालयाकडून दुचाकीने घरी येत असताना आयटीआयच्या मागील गल्लीत समोरुन येणाजया दुचाकीने त्याला धडक दिली.