दुचाकीतून पेट्रोल चोरणारे परप्रांतीय चोरटे जाळ्यात

0

धरणगाव- धरणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत पारधी दूरक्षेत्र दोन पेट्रोल चोर पेट्रोलिंग करताना मिळून आले. त्यांच्या ताब्यात हिरो होंडा मोटरसायकल व त्यातील डिक्कीत साडेतीन लिटर प्रत्येकी एक लिटर बिसलेरी बॉटलमध्ये पेट्रोल मिळून आले. त्यांची विचारपूस करता त्यांनी ते पारधी खुर्द गावातील मामाजी प्लॉट भागातून पेट्रोल चोरल्याची कबुली दिली. भुर्‍या जगदीश बारेला व हिरालाल जगदीश बारेला (बडगाव शेंधवा हल्ली मुक्काम पथराड शिवार) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशन येथे पेट्रोल चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रगस्त दरम्यान पोलीस नाईक विजय चौधरी, सुमित पाटील, अरुण निकुंभ यांनी ही कारवाई केली.