दुचाकीने धडक दिल्याने दोघे जखमी

0

आरटीओ कार्यालयाजवळील घटना; रामानंद पोलिसात तक्रार

जळगाव । डीमार्टकडून आरटीओ कार्यालयाकडे जात असतांना सेन्ट्रल बँकेसमोर आई व मुलगा गाडीवरून जात असतांना समोरून येणार्‍या दुचाकीस्वार महिलेने ठोस मारून फरार झाल्या. या घटनेत आईसह मुलगा जखमी केल्याची घटना 7 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून रामांनद पोलिस स्थानकान तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहा दिपक कांबळे (वय-37, रा.लक्ष्मीनगर, भारत पेट्रोलियम कॉटर) ह्या शिरसोली नाक्याजवळी डिमार्ट ते उपप्रादेशिक कार्यालयाजवळील सेन्ट्रल बँकेकडे दुचाकी क्र. (एमएच 19 सीबी 0880) ने आपल्या मुलगा कुणाल सोबत जात असतांना समोरून येणार्‍या मोटारसायकल क्र.(एमएच 19 डीवाय 8487) वरील अज्ञात महिलेने (नावगाव माहिती नाही) रोड ओलांडण्याच्या नादात नेहा कांबळे यांच्या दुचाकीला धक्का दिल्याने दुचाकीवरील दोघेजण पडल्याने डोक्याला जखमी झाले. दरम्यान घटना घडल्यानंतर समोरील वाहनावरील महिला न थांबता तीची दुचाकी घेवून पळ काढला. या घटनेची चौकशीसाठी रामांनद पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.