दुचाकीवरुन पडल्याने युवक जखमी

0

जळगाव – समोरून येत असलेल्या कारला धक्का दिल्याने दुचाकीवरून खाली पडून तरूण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कालिंका माता चौक परिसरात घडली. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी तरूणांनी धाव घेतली. नंतर जुने जळगावातील तरूणांनी ऑटो रिक्षा थांबवून जखमीस तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविले. नीलेश अत्तरदे (वय- ३०) रा.विठ्ठलपेठ जुने जळगाव असे जखमीचे नाव आहे. नीलेश हा मोटारसायकल पोहोचविण्यासाठी जात होता. समोर संथगतीने येणाऱ्या कारला धडक बसून दुचाकीवरून नीलेश रस्त्यावर पडला. त्याच्या अंगावर दुचाकी पडली होती. जवळ असलेल्या काही तरुणांनी एका रिक्षात बसवून त्याला सिव्हीलमध्ये हलविले. दरम्यान घटनेची माहिती कळताच विठ्ठलपेठ येथील नातेवाइकासह तरूणांनी सिव्हीलमध्ये धाव घेतली. नीलेश याच्या डोक्याला जखम झाली असून हातापायाला खरचटलेले आहे.