दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 15 हजारांचा ऐवज असलेली तरुणीची पर्स लांबवली

Dhoom Style Purse Removed From Young Girl’s Hand : Fakery Toll Naka Incident भुसावळ : वडिलांसोबत दुचाकीने भुसावळकडे येणार्‍या तरुणीच्या हातातील पर्स दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी धूम स्टाईल लांबवली. ही घटना फेकरी टोल नाक्याच्या अलिकडे शुक्रवार, 12 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा
तक्रारदार प्रदीप ज्ञानदेव इंगळे (60, पोलिस ठाण्याजवळ, वरणगाव) हे त्यांची मुलगी रुचा राणे हिला सोडण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर येत असताना फेकरी टोल नाक्याच्या अलिकडे शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी तरुणीच्या हातातील पर्स हिसकावून पोबारा केला. पर्समध्ये दहा हजारांची रोकड, पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एटीएम कार्ड असा एकूण 15 हजारांचा ऐवज होता. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.