दुचाकीवरून पडल्याने महीलेचा मृत्यू

0

चाळीसगाव – पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील २९ वर्षीय महीला सार्वे खाजोळे रस्त्यावर ३० रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या उपचारासाठी धुळे येथे नेत असतांना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सार्वे येथील सपना नारायण भालेराव (वय-२९) यांचे आधारकार्ड काढण्यासाठी नगरदेवळा येथे जाण्यासाठी त्यांचे पती नारायण रंगनाथ भालेराव (वय-३२) यांच्यासह मोटारसायकल वर जात असतांना सार्वे शिवारातील सार्वे खाजोळे रस्त्यावर त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने सपना भालेराव या डोक्यावर पडल्याने मेंदुला जबर मार लागला होता. त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात आणले होते मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहीकेतुन धुळे येथे नेत असतांना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पाचोरा पोलीस स्टेशनला झिरो नंबरने वर्ग करण्यात आली आहे.