जळगाव : शहरातील खोटेनगर परीसरातील गुरूदत्त कॉलनीतून घरासमोरील पोर्चमधून दुचाकीसह डक्कीतील लॅपटॉप चोरीला गेला. ही घटना शनिवार, 8 जानेवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोर्चमधून दुचाकी लंपास
धीरज विश्वासराव पाटील (45, रा.गुरूदत्त कॉलनी, खोटेनगर, जळगाव) यांनी आपली दुचाकी (एम.एच.19 ए.डब्ल्यू.4306) शुक्रवार, 7 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता कामावरून आल्यानंतर घराच्या पोर्चमध्ये पार्किंगला लावली. मोपेड गाडी असल्याने त्यांनी त्यांचा 15 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप देखील दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. रात्री सर्वजण जेवण करून झोपले असता चोरट्यांनी दुचाकी आणि लॅपटॉप लांबवला. ही घअना शनिवारी सकाळी उघडकीला आली. या प्रकरणी धीरज पाटील यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विजय दुसाणे करीत आहेत.