चिंचवड : दुचाकीस्वाराचा रस्त्याने जाणार्या व्यक्तिला धक्का लागला. याचा जाब विचारल्यावरून झालेल्या भांडणात तीन जणांना मार लागला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड येथे घडला. मिळालेल्या माहितीनुसार, दळवीनगर येथे प्रेमलोकपार्क सोसायटीजवळून एका दुचाकीवर तिघेजण वेगात जात होते. वेगात जाताना दुचाकीचा धक्का रस्त्याने जात असलेल्या इसमाला लागला. त्यामुळे धक्का लागलेल्या इसमाने दुचाकीस्वारांना दुचाकी हळू चालविण्याचा सल्ला दिला. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.