दुचाकीस्वाराचा मृत्यू, एकाविरुद्ध गुन्हा

0

यावल– यावल-डांभूर्णी मार्गावर दोन दुचाकींची धडक होवून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अनोळखी दुचाकीस्वाराविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 13 रोजी झालेल्या अपघातात प्रदीप शालिक जगताप (55, रिधूर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राजेंद्र शालिक जगताप (रिधूर) यांच्या फिर्यादीनुसार दुचाकी (एम.एच.41 ए.आर.1051) वरील चालक (नाव, गाव माहित नाही) विरुद्ध यावल पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अशोक अहिरे करीत आहेत.