दुचाकीस्वाराचा मृत्यू, ट्राला चालकाविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : भुसावळ-जळगाव रस्त्यावरील कपूर पंपाजवळ सतीश साहेबराव सपकाळे (32, मोहाडी, जि.जळगाव) यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्राला चालक राजेंद्रकुमार रामस्वरूप बिष्णोई (बिकानेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला होता. मोहन चौधरी यांनी या प्रकरणी नशिराबाद पोलिसात फिर्याद दिली.