पुणे : बस घेऊन निघालेल्या पीएमपीचालकाने उलट्या बाजूने येणार्या दुचाकीस्वाराला बाजूला सरकण्यास सांगितल्याच्या कारणावरून चालकास मारहाण केल्याचा प्रकार घडला. लष्कर परिसरातील जान महम्मद रस्त्यावर शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घड़ला. पीएमपीचालक व्यंकटी धनगरे (36, रा. लोणी काळभोर) यांनी याप्रकरणी लष्कर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनगरे हे त्यांच्या ताब्यातील बस वारजेकडून हडपसरकडे घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेऩे आलेल्या आरोपीला त्याची दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून त्याने धनगरे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बस अडवून धनगरे यांना मारहाण करून निघून गेला. सहायक पोलिस निरीक्षक अमित घुले पुढील तपास करत आहेत.