जळगाव- समोरून येणार्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात कार चित्रा चौकातील किरण चहा दुकानाच्या शटरच्या भिंतीला धडकली. ही घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील दोघांना सुदैवाने जमखी झालेले नाहीत.
लक्ष्मीकांत शामकुमार बेनगिरी (वय-26) हे भारत पेट्रोलियम क्वाटर्स येथे कुटूंबियांसोबत राहतात. रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास लक्ष्मीकांत हे शेजारी राहणारे अतिष फोजदार यांनासोबत घेवून कार क्रं. एमएच. 19.बीएन.9381 ने सागरपार्क जवळील रॉयल पॅलेस येथे जेवणासाठी गेले. रात्री जेवण आटोपल्यानंतर दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी नेहरू चौकात आले. नेहरू चौकातील आईस्क्रम दुकान बंद दिसले. टॉवर चौकात जावून देखील दुकान बंद दिसल्यानंतर लक्ष्मीकांत बेनगिरी हे घरी जाण्यासाठी तेथून निघाले. चित्रा चौकातून कोर्ट चौकाकडे रात्री 11 वाजता जात असतांना असतांना त्यांच्या कार समोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी आपली कार वळविली. मात्र, कार किरण चहा दुकानाच्या भिंतीला धडकली. दुचाकीस्वार तेथून पसार झाला. कार खाली उतरून लक्ष्मीकांत यांनी कारला पाहिले असता कारचे पुढील शो, गाडीचे बोनट, बंफर, हेडलाईट, टायर चे नुकसान झालेले दिसले. तसेच सोमवारी शहर पोलीस स्टेशन गाठत लक्ष्मीकांत घटना सांगित कारचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.