चिंचवड । येथील लिंकरोड परिसरात एका अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. जयप्रकाश शिवनारायण तोतले (वय 66, रा. मोरया गोसावी, राजपार्क, चिंचवड गाव), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी तोतले यांचा मुलगा सुहास तोतले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तोतले हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात कार चालकाने तोतले यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये तोतले गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.