अमळनेर । येथील शिंदी कॉलनीतील युवकाचा मोटारसायकल अपघात झाल्याने मृत्यु झाला. रविवारी 21 रोजी दुपारी 2.30 वाजेदरम्यान पैलाड भागातील शनी मंदिर परिसरात ही घटना घडली. अमळनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे करण मेघराज सासनानी असे मयताचे नाव आहे. त्याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले प्रेम कुमार अशोक सासनानी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत त्याच्या पश्यात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे.