दुचाकी अपघातात तरुण जखमी : एकाविरोधात गुन्हा

Speeding two-wheeler collided on Yawal-Viravali road: Korpavali youth injured ; Offense Against Biker यावल : यावल-विरावली रस्त्यावर गुरुवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन दुचाकींचा अपघात होवून त्यात एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शुक्रवारी एका दुचाकी धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात दुचाकीचे नुकसान
कोरपावली येथील सागर चंद्रकांत तायडे (23) या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तो कोरपावलीकडून यावलकडे दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.के. 7027) द्वारे येत असतांना यावलकडून भरधाव वेगात दहिगावकडे जाणार्‍या दुचाकी (एम.एच.19 डी.यु.1383) वरील चालकाने समोरून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले व अपघातात सागर चंद्रकांत तायडे हा गंभीर जखमी झाल्याने ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला सिव्हीलमध्ये हलवण्यात आले.

दुचाकी चालकाविरोधात गुन्हा
शुक्रवारी यावल पोलिसात त्याने तक्रार दिल्यानंतर दुचाकी (क्रमांक एम. एच.19 डी.यु.1383) वरील चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश खडके करीत आहे.