दुचाकी अपघातात दोघे जखमी

0

यावल : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर साकळी गावाजवळ दुचाकीचा अपघात होवून दोन जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शनिवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडला. दोघा जखमींना जळगाव हलवण्यात आले आहे.
किनगाव, ता.यावल येथील सोेहन हिवराळे (23) व रफीक सुपडू कुरेशी (20) हे दोघे शनिवारी दुपारी दुचाकी (क्रमांक एम.पी. 47 एम. जे. 4627) ने यावलकडून किनगावकडे जात असताना दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास साकळी गावाजवळील भारत तोल काट्याजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीस कट मारल्याने घडलेल्या अपघातात दोघे जखमी झाले. यात सोहन हिवराळे यांच्या पायाला दुखापत झाली तर रफीक कुरेशी यांच्या डोक्याला जबर दुखापत होत तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी साकळीतील जगदिश पाटील, कैलास महाजन, किरण मराठे यांनी जखमींना तातळीने मदत केली व 108 रुग्णवाहिका बोलावल्यानंतर डॉ.इरफान खान, प्रवीण बारी जखमींवर प्रथमोचार करून त्यांना तत्काळ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.