जळगाव । दुचाकी घसरून पिता-पुत्री जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, दोघांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. जामनेर तालुक्यातील एकुलती येथील रहिवासी अशोक भागवत जाधव (वय-32) व त्यांची मुलगी आरती (वय-5) हे दोघं पिता-पुत्री दुचाकीवरून जात असतांना अचानक दुचाकी घसरली. यात दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या हाता-पायाला किरकोळ जखमा आहेत.