दुचाकी अपघातात वढवेतील तरुण जखमी

भुसावळ : भरधाव बुलेटस्वाराने दुचाकीला धडक दिल्याने वढवे येथील तरुण जखमी झाला तसेच दुचाकीचे नुकसान झाले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात बुलेट चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन समाधान कोळी (28, वढवे, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार बुलेट चालक मयूर संजय जैन (सावदा) यांनी त्यांची बुलेट एम.एच.19 डीसी 1589 ही रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालवत त्यांच्या दुचाकी (एम.एच.19 सी.डी.2766) ला जोरदार धडक दिली. या अपघातात कोळी यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच दुचाकीचे नुकसान झाले. हा अपघात 27 जून रोजी रात्री साडेआठ वाजता महामार्गावरील बोहर्डी फाट्याजवळ घडला. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत.