दुचाकी-अ‍ॅपे रीक्षात अपघात : दोन जण जागीच ठार : एक गंभीर

Fetal Accident on Shirpur-Dahiwad Road : Two Killed शिरपूर : तालुक्यातील शिरपूर-दहिवद रस्त्यावरील मुंबई-आग्रा महामार्गावरील शहादा फाट्यालगत महाराणा प्रताप रेस्ट हाऊस समोर दुचाकी आणि अ‍ॅपेत झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात हा 29 ऑगस्ट 2022 रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडला.

यांचा झाला मृत्यू
अ‍ॅपे (एम.एच.19 ए.ई. 9815) ही विरुद्ध बाजूने येत असतांना व दुचाकी (एम.एच.18 बी.0506) मध्ये समोरा-समोर धडक झाल्यानंतर या अपपघातात गोकुळ सुरपाल पावरा (रा.लाकड्या हनुमान, ता.शिरपूर) व संतोष तुकाराम पावरा (रा.टेंबला, ता.सेंधवा, मध्यप्रदेश) या दोघांचा मृत्यू झाला तर सुवालाल देवा पावरा (धाबापाडा, ता.सेंधवा, मध्यप्रदेश) हा जखमी झाला.

अपघात प्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणी अज्ञात अ‍ॅपे रीक्षा चालक खबर न देता घटनास्थळावरून खबर न देता पसार झाल्याने व मयताच्या मृत्यूस व जखमीस कारणीभूत असल्याची दिनेश सुवालाल पावरा याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात अ‍ॅपे चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास हवालदार पवार करीत आहे.