यावल- तालुक्यातील हंबर्डीजवळ दुचाकी व ओमनीत धडक होवून दुचाकीस्वार दाम्पत्य जबर जखमी झाले. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. जखमींना फैजपूर येथे प्रथमोपचार करून जळगाव हलवण्यात आले असून पतीची प्रकृती गंभीर आहेे. निमखेडी, ता.जळगाव येथील गणेश किसन कुंभार (38) व प्रमिला गणेश कुंभार (36) हे दाम्पत्य दुचाकी (एम.एच.19 बी.एच.6393) व्दारे न्हावी, ता. यावल येेथे लग्न समारंभाकरीता जात असताना यावल-फैजपूर रस्त्यावर हंबर्डी गावाच्या पुढे वळणावर फैजपूरकडून यावलकडे येणारी ओमनी (एम. एच.19 एल. 5285) या वाहनाने दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचे हँडल व पुढील चाक वेगळे झाला. रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या या दाम्पत्यास ये-जा करणार्यांनी तत्काळ फैजपूर येथील एका खाजगी रूग्णालयात प्रथमोपचार केले व त्यात गणेश कुंभार यांची प्रकृती अधिक खालवल्यानेे त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले.