दुचाकी घसरल्याने दहिगावचे दोघे जखमी

0

यावल- सातोदकडून शहरात येणार्‍या दुचाकीस्वारांचा अपघात होत दोन जण गंभीर जखमी झालेे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी घडला. दोघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगावी हलवण्यात आले. दीपक राजु पाटील (28) व अशोक बाळू पाटील (28, रा.दहिगाव, ता.यावल) हे दहिगावातून सातोद येथे दुचाकी (क्रमांक एम.एच.19-7811) व्दारे आले होते. दरम्यान सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सातोदहून यावलला येत असतांना दुचाकी घसरून दोघे गंभीर जखमी झाले. त्यात दीपकच्या हाताला व पायास दुखापत झाली तर अशोकला डोक्याला मार लागला. दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात अधिपरीचारीका संगीता डहाके, गुलाम अहेमद यांनी प्रथमोपचार केले व त्यांना तत्काळ जळगाव हलवले.