दुचाकी घसरल्याने दाम्पत्य जखमी

0

जळगाव। पाळधी गावानजीकच्या गॅस गोडावूनजवळ दुपारी 12 वाजता ट्रकने दुचाकीला कट मारला. यात दुचाकी घसरून महामार्गाच्या कडेला पाटील दाम्पत्य फेकले जावून गंभीर जखमी झाले. यातच महामार्गावरून जात असलेल्या अ‍ॅब्युलन्सला नागरिकांनी थांबवून दाम्पत्यास त्यात बसवून दांम्पत्यास जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डोक्याला व पायाला दुखापत झाली आहे.

तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी रविंद्र देवराम पाटील (वय-40) व त्यांच्या पत्नी पिंकूबाई दुचाकीने मंगळवारी सकाळी बोरखेडा येथे नातेवाईकांकडे अत्यंसंस्काराला गेले होते. यानंतर सकाळी अत्यंसंस्कार आटोपून पुन्हा दुचाकीने घराच्या मार्गाला निघाले. या दरम्यान, दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाळधी गावानजीकच्या गॅस गोडावून जवळून जात असतांना मागून भरधाव येणार्‍या ट्रकने त्यांना ओव्हरटेक करून कट मारला. यात दुचाकीवरील नियत्रंण सुटून दुचाकी घसरली. त्यामुळे रविंद्र पाटील व त्यांच्या पत्नी पिंकूबाई हे रस्त्याच्याकडेला फेकले गेले. यात रविंद्र यांना पायाला तर पिंकूबाई यांना डोक्याला दुखापत झाली. त्यावेळातच त्या ठिकाणाहून अ‍ॅब्युलन्स जात असतांना नागरिकांनी अ‍ॅब्यूलन्स थांबवून पाटील दाम्पत्यास त्यात बसवून जिल्हा रूग्णालयात रवाना केले. यावेळी पाळधी पोलिसही घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. दरम्यान, पाटील दाम्पत्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांना पाहण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती.