दुचाकी घसरल्याने दोघे जखमी

0

जळगाव । एयू फायनान्स कंपनीची वसुली करून पाचोर्‍याहून दुचाकीने परतत असतांना दोन जण नांद्राजवळ मोटारसायकलने धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालया उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयूर भगवान चौधरी (वय-20) रा. कांचन नगर आणि सुरेश मोहन तायडे (वय-28) रा. शनिपेठ हे दोघे पांडे चौकातील एयू फायनान्स कंपनीत कामाला आहे. कंपनीच्या वसुलीसाठी पाचोरा येथे गेले होते. पाचोर्‍याहून वसुल केल्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास नांद्राजवळ मोटारसायकल जात असतांना दुचाकी घसरल्याने दोघेजण जखमी झाले. दोघांना नागरीकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.