जळगाव । सीईटीची परिक्षेला दुचाकीने ट्रिपल सिट भडगावहून जळगावकडे येत असतांना पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावाच्या जवळपास येत असतांना दुचाकी घसरल्याने दोघे जण गंभीर झाले तर तिसर्या विद्यार्थ्यांस किरकोळ दुखापत झाली आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन संजय शिरसाळ (वय-18), मुयर संजय शेलार (वय-18) आणि भुषण अनिल निकम (वय-18) तिघे रा. भडगाव यांनी नुकतेच बारावीची परीक्षा दिली असून सीईटीच्या परीक्षेसाठी भडगावहून पाचोरा मार्गे जळगावला मोटारसायकलने ट्रिपल सिटने येत असतांना नांद्रा गावाजवळ खड्डा आल्याने दुचाकी घसरल्याने तिघे मेन रोडावर पडले. यात पवन शिरसाठ आणि मयूर शेलार हे दोघी जखमी झाले. पवन शिरसाठला गंभीर जखमी झाल्याने त्यांला शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. तर मयूरला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर भुषण निकमला कोणतीही दुखापत झाली नाही.