खडकी : भरगाव वेगाने दुचाकी चालवुन दुचाकी घसरुण पडल्याने एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे संगम पुलाजवळ घडली असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली. गुरुवारी हार इसम पुण्यावरुन संगम पुल खडकीमार्गे दुचाकी वरुन भरगाव वेगाने जात असताना त्याची दुचाकी घसरुन खाली पडली. त्यामध्ये गंभिर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने या इसमाचा जागीच मृत्यु झाला. मरीआई गेट पोलीस चौकी येथिल कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिस तपासात इसमाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या इसमाचे वय अंदाजे 50 वर्ष असुन मोटर सायकलचा क्रमांक एम.एच.12 एफ.एम.9585 आहे. वाहतूक पोलीस व विभागाकडुन माहिती घेत आहेत.