दुचाकी घसरून युवक ठार

0

चिंचवड : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना थरमॅक्स चौकात रविवारी (दि. 17) घडली. अभिजित बबनराव काटकर (वय 40, रा. संभाजीनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी अभिजित यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.