रावेर : तालुक्यातील अटवाडे येथील रहिवासी दोन युवक मोटरसायकलने बुरहानपुर येथे जात असताना रावेर-बुरहानपुर महामार्गावर चोरवड-लोणी दरम्यान अपघात होवुन एक जण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अटवाडे येथील रहिवासी किशोर मधुकर पाटील वय (४७) व दिनकर वसंत पाटील हे दोघे त्यांच्या दुचाकी (एम.एच.१९ डी. ६९७२) ने संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बुरहानपुरकडेे जात होते तर चोरवड -लोणी (म.प्र.) दरम्यान समोरून येणाऱ्या टाटा मॅजिक (एम .पी .०७ -टी ०७०५) या क्रमांकाच्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाडीने समोरून जोरदार धडक दिल्याने दिनकर वसंत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर किशोर मधुकर पाटील यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला असुन मांडीचे हाड तुटल्याने त्यांना बुरहानपुर येथील अॅपल हाॉस्पिटल तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे. परीसरातील हि १५दिवसात अपघाताची दुसरी घटना आहे …या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मॅजिक चालक पासर झाला असून गाडी लालबाग पोलिसांनी जमा केली आहे . रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम लालबाग (म.प्र) पोलिस स्टेशनला सुरू होते.
Prev Post
Next Post