दुचाकी चोरटा जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : शहरातील अयोध्या नगरातील रायसोनी शाळेसमोरून शुभम रामदास ईश्वरे (27, रा.अयोध्या नगर, जळगाव) यांची दुचाकी (एम.एच.19 डी.डी.9183) शनिवार, 2 एप्रिल रोजी दुपारी चोरीला गेली होती. या प्रकरणी बुधवार, 6 एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीवरून पोलिसांनी आरोपी विनायक गणेश सोनवणे (वढोदा, ता.यावल) यास बुधवारी रात्रीच ताब्यात घेतले होते व पोलिस चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत दुचाकी काढून दिली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास 9 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील एएसआय आनंदसिंग पाटील, नाईक गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी आदींच्या पथकाने आरोपीला अटक केली. तपास नाईक विकास सातदिवे करीत आहेत.