धुळे : दोंडाईचा शहरातून दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शिरधाणे, ता.धुळे येथील दुचाकी चोरट्याला धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. भैय्या राजेंद्र गोसावी (35, शिरधाने, ता.जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दोंडाईचा शहरातील विजयकुमार छन्नुसिंग तमाईचेकर यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.18 ए.एच.8340) ही रेल्वे स्थानक परीसरातून चोरीला गेली होती. या प्रकरणी तपास सुरू असताना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास राहत्या घरातून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. आरोपीला दोंडाईचा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सुर्यवंशी, धनंजय मोरे, प्रकाश सोनार, पंकज खैरमोडे, कैलास महाजन, किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने केली.