दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

फैजपूर : भुसावळ शहर पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला फैजपूर पोलिसांच्या पथकाने बुधवार, 12 रोजी अकलूद नाका येथून अटक केली. शुभम शेखर पाटील (अकलुद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक किरण चाटे, हेमंत वंजारी, उमेश सानप, विकास सोनवणे या पथकाने कारवाई करीत भुसावळ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.