जळगाव : जळगाव शहरातील चंदू अण्णा नगर परीसरातून एकाची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लाबवली. जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुचाकी लांबवल्या जात असल्याने दुचाकी चालकांमध्ये भीती पसरली आहे.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
प्रफुल्ल ज्ञानेश्वर पाटील (30, रा.चंदूअण्णा नगर) या तरुणाने शनिवार, 19 मार्च रोजी रात्री आठ वाजता कामावरून घरी आल्यानंतर पार्किंगमध्ये दुचाकी (एम.एच.19 सी.डी. 2203) लावली मात्र मध्यरात्री दुचाकी चोरीला गेली हा प्रकार रविवार, 20 मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीला आला. प्रफुल्ल पाटील यांनी सोमवार, 21 मार्च रोजी रात्री 10 वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल तायडे करीत आहे.