दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या : जिल्ह्यातील दोन दुचाकी चोरींचा उलगडा

Minor two-wheeler thief in Anjale in the Net : Two Cases Of Two-wheeler theft in Sawda Revealed जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अंजाळे येथील अल्पवयीन दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले असून सावदा हद्दीतील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयीतला सावदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
अंजाळे, ता.यावल येथील अल्पवयीन मुलगा चोरीच्या मोटार सायकल कमी किंमतीत विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. सहा.फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार दीपक शांताराम पाटील, हवालदार महेश आत्माराम महाजन, नाईक नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, भगवान तुकाराम पाटील, राहुल बैसाणे, चापोहेका भारत पाटील आदींच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने आपला गुन्हा कबुल केल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

एक संशयीत पसार
सावदा पोलिस स्टेशनला दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून हे गुन्हे तेजस सपकाळे (रा.अंजाळा, ता.यावल) याच्या मदतीने केले असल्याचे ताब्यातील अल्पवयीन बालकाने कबुल केले असून पसार असलेल्या तेजस सपकाळेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

आवळल्या मुसक्या : जिल्ह्यातील दोन दुचाकी चोरींचा उलगडा

जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने अंजाळे येथील अल्पवयीन दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले असून सावदा हद्दीतील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयीतला सावदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.