दुचाकी चोरट्यास पोलीस कोठडी

0
जळगाव । शहरातील तांबापुरा भागात राहणाऱ्या शेख सत्तार बशीर पिंजारी (वय-५३) यांची दुचाकी (एमएच १९ एक्स ५५३८) १ जून रोजी चोरीस गेली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भडगाव येथील शकील खान व भुषण शिंदे या चोरट्यांना ९ सप्टेबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. दोघांना रविवारी जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड.सुप्रिया क्षिरसागर यांनी काम पाहिले.