बोदवड- शिरसाळा मारोती मंदिराच्या बाहेर पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरी प्रकरणी सागर उर्फ करण शामराव चव्हाण (वय 19, रा.निमखेडी ता.मुक्ताईनगर) याला अटक करण्यात आली. 24 नोव्हेंबर रोजी पार्किंगमधून दुचाकी (क्रमांक एम.एच.28-एडी-8099) 24 नोव्हेंबरला चोरीस गेली होती. याप्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी 24 तासात छडा लावून आरोपीला अटक केली. याप्रकरणी 25 नोव्हेंबरला उपनिरीक्षक दिलीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोसले, प्रभाकर पाटील, निखिल नारखेडे, तुषार इंगळे, प्रवीण चौधरी, मुकेश पाटील, मनोज पाटील, शशिकांत महाले यांनी या प्रकरणाचा छडा लावला. तपास संजय भोसले करत आहेत.