चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून आणखी चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी या दुचाकी नांदगाव हद्दीतून चोरलेल्या कबुली दिली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील देशमुखवाडी येथील सागर प्रवीण केले यांनी आपली होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी (क्र.एम.एच. 19 बी.एक्स.1203) रविवार, 26 जून रोजी जुने नगरपालिका जवळून चोरी केल्याने चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी सतीश सुरेश पाटील (19, पाथराड, ता.भडगाव) अटक केली होती. आरोपीने चार दुचाकींची कबुली दिल्याने शहर पोलिसांनी सव्वा लाखांच्या दुचाकी जप्त केल्या होत्या तर या प्रकरणी सतीश सुरेश पाटील (19, पथराड, ता.भडगाव) व विलास रवींद्र देसले (पाटील, 23, पिंप्री) या दोघांना अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे, पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, हवालदार सुहास आव्हाड, अभिमन पाटील, राहुल सोनवणे, सुभाष घोडेस्वार, दीपक पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, प्रवीण जाधव आदींनी केली. तपास पोलिस नाईक राहुल सोनवणे करीत आहेत.