जळगाव – सुटी असल्याने दुचाकीने गावाकडे आईला पैसे देण्यासाठी जात असलेल्या तरूणाचा पिंप्री गावाजवळील वळणावर दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झाला असून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत धरणगाव पोलीसात नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, भरत पांडूरंग कोळी (वय-29) रा. पातोंडा ता.अमळनेर हा गेल्या दोन महिन्यापासून कुसुंबा जि.जळगाव येथे कामाला आहेत. कंपनी कामाला असल्याने पगाराचा चेक मिळाला होता. तो घेवून पातोंडा येथे शालकाची दुचाकीवरून धरणगाव मार्गे जात होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास पिंप्री येथील चैताली जिनींग कंपनीजवळील वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाला चुकवत असतांना दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते दुचाकीवरून रोडाच्या खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पिंप्री गावातील जि.प. सदस्य गोपाल चौधरी यांनी त्यांच्या वाहनात जखमीस तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.