यावल- अज्ञात दुचाकीस्वाराने समोरून येणार्या दुचाकीस जबर धडक दिल्याने विरावलीचा ईसम गंभीर जखमी झाला. गुरूवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास यावल-विरावली रस्त्यावर हा अपघात झाला. जखमीस ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. पिंताबर आधार निळे (55, रा.विरावली) हे यावल शहरातून काम आटोपून गुरूवारी रात्री दुचाकीवर विरावलीकडे निघाले होते याचवेळी विरावलीकडून यावलकडे भरधाव वेगात येणार्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जबर धडक दिली व अपघातानंतर पळ काढला. या अपघातात निळे यांना डोेक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना काही नागरीकांनी ग्रामीण रूग्णालयालय उपचारार्थ दाखल केले येथे. डॉ.रश्मी पाटील, डॉ.उमेश कवडीवाले यांनी प्राथमिक उपचार केले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.