शहादा। येथील पंचायत समितित आज रोजी सायंकाळी साडे पाच वाजता जुन्या कुरापतीवरुन नवागाव ता शहादा येथील 30 ते 40 जणानी दुधखेडा येथील ग्रामसेवक व त्याच्या भावाला कार्यालयात घुसुन सिनेस्टाइल मारहाण केल्याने खळबळ माजली आहे. तात्काळ पोलीसाना पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला या हाणामारीत ग्रामसेवक सह त्याच्या भाऊ जबर जखमी झाले आहेत. मुरारजी भंडारी रा. शहादा हे तालुक्यातील दुधखेडा गावाला ग्रामसेवक आहेत. सध्या ते काही कारणास्तव निलंबित आहे. त्याची पत्नी पिंगलाबाइ भंडारी या प.स. सदस्य आहेत. गेल्या चार महिन्यापासून ग्रामसेवक मुरारजी भंडारी व जि. प . सदस्य सुनिल चव्हाण यांच्यात वाद सुरु होता. शिवाय काही आपसांतील मतभेद होते ते चव्हाट्यावर आलेत. मुरारजी भंडारी यानी जि . प. सदस्य सुनिल चव्हाण यांच्या तक्रारीमुळे निलंबित झालो असा अरोप वेळोवेळी केल्याने वाद वाढत गेला.
ग्रामसेवकासह भावाला जमावाने मारले
आज सायंकाळी साडे पाच वाजता नवागाव येथील 30 ते 40 जणानी सरळ पंचायत समिती कार्यालय गाठले व आवारात ग्रामसेवक मुरारजी भंडारी व भाउ प्रभु भंडारी यांना बाहेर काढले. मोठा जमाव बघता सभापती दरबारसिंग पवार व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला. पण कार्यालयात मोठ्या प्रमाणात हाणामारी सुरु झाली. ग्रामसेवक व त्याचा भावाला जबर मारहाण झाली. यात दोघे जखमी झाले आहेत. ग्रामसेवक व त्याच्या भाऊ प्रभु भंडारी यांनी जमावाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला . हा सारा प्रकार बघता पोलीसांना पाचारण करण्यात आले. पोलीसांनी लागलीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. दोन्ही गटातील लोकांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. उशीरा पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. जखमी ग्रामसेवक मुरारजी भंडारी व भाऊ प्रभु भंडारी यांचेवर नगरपालिका रुग्णालयाय उपचार करण्यात आले.