ठाणे : डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देसाई गावात राहणाऱ्या आणि २० वर्षांपासून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या दोघं भावंडाना दारूची वाहतूक करता काय म्हणीत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात घुसून बेकायदेशीर झडती घेतल्यानंतर काही न सापडल्याने पोलीस ठाण्यात आणून त्यांना जबर मारहाण केल्या प्रकरणी तक्रारदार अंकुश म्हात्रे यांनी डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्ण काटकर यांच्या गैरकृत्याची ठाणे पोलीस आयुक्त व राज्याचे मुंख्यमंत्री याना लेखी तक्रार केली आहे. दरम्यान आता प्रकरण मिटविण्यासाठी काटकर यांचे हस्तक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
तक्रारदार अंकुश म्हात्रे देसाई गावात दूध विक्रीचा व्यवसाय करतात १५ एप्रिल रोजी दूध ग्राहकांना पोहचवून घरी आल्यावर घरात झोपलेले असताना डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ कृष्ण काटकर घरी आले आणि रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकीची माहिती विचारू लागले पण हा प्रकार माहित नसल्यामुळे म्हात्रे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. मग पोलिसांनी अंकुश म्हात्रे आणि काळुराम म्हात्रे याना घराबाहेरच मारहाण केली . त्यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन गंभीर मारहाण केली. मारहाण एवढी गंभीर होती कि अंकुश आणि काळुराम यांनी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर झालेल्या प्रकारची डायघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. अखेर डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर यांच्या गैरकृत्या प्रकरणी अंकुश म्हात्रे यांनी लेखी तक्रार मुख्यमंत्री देववंद्र फडणवीस याना दिली आहे गावातील ज्या दारू विक्रेत्यांच्या शोधात पोलीस आले होते ते मोकाट आणि बिनदिक्त गावठी दारूची विक्री आणि वाहतूक करीत आहेत. पण डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ काटकर यांनी जबरदस्ती खोटा गुन्हा दाखल करीत ” चोर सोडून संन्याशाला फासी” देण्याचा प्रयत्न डायघर पोलिसांकडून जाणीवपूर्वक केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. अधिकाराचा गैरवापर करून मारहाण प्रकरणी डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ काटकर यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाईची परवानगी मिळावी अशी याचना हि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .