दुधाच्या टॅकरखाली सापडून महिलेचा मृत्यू

0

चाळीसगाव । तालुक्यातील टाकळी प्र.दे बस स्टॅण्डवर उभे असलेल्या 60 वर्षीय महिलेला दुधाच्या टँकरने धडक दिल्याने महिला टॅकरच्या मागच्या चाकाखाल सापडून तिचा जागीच मृत्यु झाल्याची घटना 7 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली असुन मेहुणबारे पोलस स्टेशनला टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहिती नुसार टाकळी प्र. दे. बसस्थानका जवळ महाराष्ट्र चिकन सेंटर समोर सुमनबाई सुरेश पवार वय 60, रा. टाकळी प्र. दे. ता. चाळीसगांव या महिला उभ्या असतांना त्यांना दुधाचा टॅकर क्रमाक (एम. एच. 19 झेड 5117) ची धडक लागल्याने त्या टँकरच्या मागच्या चाकाखाली दाबल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला प्रभाकर बाबुलाल पाटील (रा. टाकळी प्र.दे. चाळीसगाव) यांनी फिर्याद दिल्या वरुन वरील टँकरच्या चालका विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार नरेंद्र सरदार करीत आहेत.