नाशिक: कोरोनाच्या काळात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. मात्र शासनाने दुधाच्या दरात वाढ केलेली नसल्याने भाजपने आंदोलन पुकारले आहे. राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून सरकार विरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. दुधाला लिटरमागे १० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपसोबतच शिवसंग्रामने देखील आंदोलन केले आहे. नागपूर, नाशिक, अहमदनगर येथे रस्त्यावर दुध फेकून देत सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचे अभिषेक घालत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपुरात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले.