थोडाफार पाऊस झाला की या खिंडीमध्ये लहान मोठे दगड, माती वारंवार कोसळत आहे. मावळ तालुक्यातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असल्याने या भागात विविध ठिकाणाहून पर्यटक येत मोठ्या संख्येने येत असतात. लोणावळा-पवनानगर हा प्रवास हा दुधिवरे खिंडीमधुन केल्यास कमी वेळात अंतर कापता येत असल्यामुळे या मार्गाचा वापर केला जातो.
काल, शुक्रवारी झालेल्या पावसामुळे या खिंडीमध्ये मोठे दगड कोसळले. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.